मंगलवार, 18 अप्रैल 2017

‘हृदयांतर’ चित्रपटासाठी मुक्ता-सुबोध आले नऊ वर्षांनी एकत्र

विक्रम फडणीस निर्मित आणि दिग्दर्शितहृदयांतरचित्रपटामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत. एक डाव भूताचाह्या चित्रपटानंतर मुक्ता-सुबोध तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 
विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. जोशी कुटूंबाच्या ह्या कथेमध्ये सौ. समायरा जोशीच्या भूमिकेत मुक्ता बर्वे तर श्री. शेखर जोशीच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहे. 
अभिनेता सुबोध भावे ह्याविषयी सांगतो, “मुक्ता आणि मी दोघेही पुण्यातले आहोत. त्यामुळे आमची मैत्री आम्ही कॉलेजमध्ये असताना भाग घेतलेल्या, पुरूषोत्तम करंडक स्पर्धेपासूनची आहे. मुंबईत आल्यावर आम्ही बंधन मालिका केली. त्यानंतर एक डाव धोबी पछाड सिनेमा केला. ती माझी खूप जुनी मैत्रीण आहेच. पण तिच्या कामाबद्दल मला अतिशय आदरही आहे. तिच्यासोबत काम करताना मी नेहमीच रिलॅक्स असतो. 
अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणते, “महाविद्यालयात असतानाचा हॅंडसम हंक, ज्याच्याशी एकदा तरी बोलावंसं वाटावं असा लाखो तरूणींची धडकनदि सुबोध भावे’  ते माझा जिवलग मित्र सुब्या असा सुबोधच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास झालाय. सुरूवातीच्या काळात सुबोधने दिग्दर्शित केलेल्या एका नाटकाचे कॉस्च्युम्सही मी केले होते. आणि हृदयांतरही फिल्म आमच्या दोघांसाठी नक्कीच एक अविस्मरणीय फिल्म असेल. 

विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर 9 जून 2017 ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

KableOne & Saga Studios Present Lakadbaggey

After much anticipation, Lakadbaggey — a KableOne Original in association with Saga Studios — has finally premiered, and it’s already creati...