शुक्रवार, 26 मई 2017

हृतिक रोशन लाँच करणार ‘हृदयांतर’ सिनेमाचा ट्रेलर

हृदयांतरचित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारा सुपरस्टार हृतिक रोशन ह्या सिनेमाचा ट्रेलर लाँच करणार आहे. 
हदयांतर सिनेमाव्दारे फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस मराठी सिनेसृष्टीत आपलं निर्माता-दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवतोय. त्यामुळे आपल्या मित्राच्या सिनेमात काम करताना हृतिक रोशन खूप खुश आहे. त्याने ह्या सिनेमाच्या रिलीजची तारीख ही ट्विटर व्दारे जाहिर केली होती. आणि आता 28 मे रोजी होणा-या ह्या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला ही हृतिक रोशन हजेरी लावणार आहे. 
सूत्रांच्या अनुसार, “हृदयांतर सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याविषय़ी सांगताच, हृतिकने ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहण्याविषयी सांगितलं. हृतिक आणि विक्रम ह्यांची मैत्री खूप जुनी आहे. 
विक्रम फडणीस म्हणतो, “हृतिक रोशन ह्या सिनेमाचा हिस्सा असल्याने ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि हृतिकने नेहमीच ह्या ना त्या प्रकारे हृदयांतरला सपोर्ट केलाय. त्यामुळेच हृतिकच्या हस्ते हृदयांतर चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणं ही आमच्या संपूर्ण हृदयांतरच्या टीमसाठी खुप महत्वाची गोष्ट आहे. हा आमच्यासाठी एक स्पेशल दिवस असणार आहे. 

टी-सीरिज प्रस्तुत, टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेला, यंग बेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतरचित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे आणि सोनाली खरे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

KableOne & Saga Studios Present Lakadbaggey

After much anticipation, Lakadbaggey — a KableOne Original in association with Saga Studios — has finally premiered, and it’s already creati...